संगमेश्वर तालुक्यात् मावळंगे गावचे जागृत देवस्थान श्री देव मानोबा चा शिमगोत्सव सुरु होत आहे.
फाल्गुन पौर्णिमेला कोकणात मोठ्या प्रमाणावर होळी हा सण साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेच्या दोन दिवस आधी श्री देव मानोबा या जागृत देवाच्या यात्रेचे आयोजन गावातील गावकरी करतात. गावातील या देवाचे वैशिष्ट्य म्हणजे जसे की, “मूर्ती लहान, पण कीर्ती महान”. गाव छोटा आहे, पाच वाड्यांनी एकत्रित आहे. ह्या मंदिरामध्ये लोक वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी नवस बोलण्यासाठी येतात. श्री. देव मानोबा मंदिराचे एवढ्या घनदाट जंगलामध्ये असूनही रात्रीच्या वेळेस हजारो लोक भावनेने श्रद्धेने दर्शनासाठी उपस्थित राहत असतात. आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाची सोय गावातील गावकरी करीत असतात.
तरी अशा या श्री देव मानोबाच्या यात्रेचे आयोजन ह्या वर्षी देखील दि. ०४ मार्च २०२३ रोजी करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता ही यात्रा सुरु होणार आहे. तरी या निमित्ताने सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.