पर्यावरण बालनाट्य स्पर्धेत रा.भा. शिर्के प्रशाला प्रथम-

रत्नागिरी | प्रतिनिधी : मॅंग्रूव्हज फाउंडेशन , इकोफॉक्स व्हेंचर मुंबई आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था कोल्हापूर संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बालनाट्य महोत्सवाचे आयोजन शहरातील सावरकर नाट्यगृहात करण्यात आले होते. समुद्र तटरक्षक कांदळवन -संवर्धन आणि संरक्षण या विषयांतर्गत ही स्पर्धा संपन्न झाली . या स्पर्धेत र.
ए. सोसायटीची रा.भा शिर्के प्रशालेच्या कुणी वाचवेल का हो माझं कांदळवन…! या बालनाट्याला दहा हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. या बालनाट्याचे लेखन व दिग्दर्शन प्रशालेतील शिक्षक श्री. अभिजीत चव्हाण यांनी केले. या स्पर्धेत श्री. अभिजीत चव्हाण यांनी सर्वोत्कृष्ट लेखन आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पारितोषिक पटकावले.
तीस विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या बालनाट्याला श्री.अभिजीत चव्हाण यांचे सोबत प्रशालेतील शिक्षिका सौ. तेजस्विनी यादव यांचेही मार्गदर्शन लाभले. तसेच या बालनाट्याच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक श्री. समीर पडवेकर सौ.अनया अभ्यंकर, श्री.रोहीत भारदे, श्री. अक्षय नवरे , श्री.उदय लिंगायत,सौ.स्नेहल भडकमकर आणि पालक यांचे सहकार्य लाभले.
पर्यावरण बालनाट्य स्पर्धेत कोणी वाचवाल का हो माझं कांदळवन…! या बालनाट्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल श्री. अभिजीत चव्हाण,
सौ. तेजस्वी यादव आणि सर्व सहभागी विद्यार्थी यांचे. र.ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रमेश चव्हाण ,उपमुख्याध्यापक श्री.
कुमारमंगल कांबळे ,पर्यवेक्षिका सौ. पुनम जाधव आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले