मुंबई क्रीडा मंडळ बामणोली स्पर्धेवर कोरले नाव
तरुण उत्कर्ष मंडळ पश्चिम वनेवाडी द्वितीय विजेता संघ
संतोष कुळे | चिपळूण : मुंबई क्रीडा मंडळ बामणोली आयोजित बामणोली चॅम्पियन ट्रॉफी 2023 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चारकोप सेक्टर 4 कांदिवली वेस्ट येथे करण्यात आले होते. या स्पर्धेवरती आदर्श तरुण मंडळ पश्चिम वणेवाडी संघ A यांनी आपलं नाव कोरत प्रथम पारितोषिक पटकावले तर तरुण उत्कर्ष मंडळ पश्चिम वणेवाडी या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
प्रथमच मुंबईसारख्या ठिकाणी बामनोलीतील सर्व युवक वर्गाने एकत्रित येऊन मुंबई क्रीडा मंडळ बामणोलीची स्थापना केली. प्रथमच ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. योग्य नियोजन करत बामनोली चॅम्पियन ट्रॉफी आयोजन केले. रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा खेळण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रत्येक वाडीतील संघ यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आदर्श तरुण मंडळ पश्चिम वनेवाडी A संघ या संघाने 5 हजार 555 व चषक आणि तरुण उत्कर्ष मंडळ पश्चिम वणे वाडी या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त करत 3 हजार 333 रुपये व चषक पटकावला. त्याचबरोबर स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून आदर्श तरुण मंडळ पश्चिम या संघाचा संतोष हरिश्चंद्र शिगवण या गौरवण्यात आले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कु. अवधूत शांताराम वणे आणि मालिकावीर म्हणून संतोष शिगवण यांना गौरवण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 8 वाजता चारकोप सेक्टर चार येथे असलेल्या मैदानावरती करण्यात आले. यावेळी गावातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. मुंबई क्रीडा मंडळ बामनोली या मंडळाला सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक वणगे, सुरेश चांदिवडे आणि संभाजी वणे, संतोष गोरिवले आणि इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. उत्कृष्ट नियोजन आणि गावातील प्रत्येक युवकांचा एकमेकाशी असलेला सलोख्याचा संबंध हे या स्पर्धेतून एक आगळेवेगळे चित्र दिसले. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा गावातील सर्व युवक आणि सभासद या निमित्ताने एकत्र येत क्रिकेट खेळाचा आनंद घेतला. मुंबई क्रिकेट मंडळचे अध्यक्ष संतोष बाबुराव कापले, कार्याध्यक्ष विकास शिगवण, उपाध्यक्ष अजित किजबिले, सचिव विजय डिंगणकर, सह सचिव स्नेहल गमरे, खजिनदार राहुल सुवरे, उपखजीनदार समीर पाले, मार्गदर्शक,आणि सल्लागार या सर्वांनी स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत ही स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेसाठी गावातील मुंबईत राहणाऱ्या सभासदांनी सहकार्याचा हात देत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हातभार लावला. या सर्वांचे मुंबई क्रीडा मंडळ बामनोली यांनी आभार व्यक्त केले आहेत. अशीच स्पर्धा दरवर्षी आणि वेगवेगळे उपक्रम मुंबई क्रीडा मंडळ बामनोली आयोजित करून मुंबईतला सलोखा कायम ठेवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी बक्षीस वितरणाचे कार्यक्रमाच्या वेळी दिले. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुनील डिंगनकर, सुधीर तांबे हरिचंद्र विटले, तुकाराम वने, लक्ष्मण शिगवण, मंगेश वणे, संतोष गोरिवली, रमेश गोरिवले, पांडुरंग कातकर, रमेश विटले आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.