कौंढर काळसूर रामाणेवाडी येथील शाळेच्या इमारती बाबत गुहागर मनसेने केलेल्या मागणीला यश

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर येथील रामाणेवाडी येथील शाळेची इमारत अत्यंत धोकादायक होती. दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळानंतर शाळेतील मुलांना शाळा सोडून शाळे बाजूला असलेल्या घरामध्ये शिकावे लागत होते. याच गोष्टीची दखल गुहागर तालुका मनसे अध्यक्ष विनोद जानवळकर तसेच सहसंपर्क प्रमुख समीर जोयशी यांनी घेऊन याबाबतची मागणी गुहागर पंचायत समिती शिक्षण विभागाकडे केली, तर त्या मागणीला यश आले असून सध्याच्या परिस्थितीत या शाळेचा एका वर्ग खोलीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आणि मुलांना इतक्या वर्षाच्या विसाव्यानंतर पुन्हा एकदा शाळेमध्ये आपलं शिक्षण मिळणार आहे.रामाणे वाडी शाळेचे नवीन इमारतिचे काम पाहणी करण्यासाठी गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर तसेच सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी ,उपतालुका अध्यक्ष सचिन जोयशी ,कौंढर काळसुर शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक ,राहुल जाधव उपस्थित होते.