प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व आंदोलन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने केलेली अन्यायकारक करवाढ त्वरीत रद्द करा अशा घोषणा देत सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवक व नागरिकांनी घंटानात आंदोलन करून लक्ष वेधले. ही करवाढ रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सावंतवाडी नगर परिषदेकडून अर्थसंकल्पात पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढवून एक प्रकारे शहरातील नागरिकांना शॉक देण्याचा प्रयत्न केला आहे मुळात २६ टक्के पेक्षा जास्त घरपट्टी वाढ करता येत नसल्याने त्याला पर्याय काढत ज्या मातीच्या घरांना २५ रुपये घरपट्टी होती त्यांना थेट ४०० रुपयापर्यंत घरपट्टी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला तर पाणीपट्टी सुद्धा प्रति युनिट मागे तीन रुपये वाढविण्यात आली सणाच्या या कारभाराबाबत श्री साळगावकर यांनी कालच ही भूमिका स्पष्ट करून या संदर्भात आवाज उठवण्याचे जाहीर केले होते त्यानुसार आज त्यांनी या संदर्भात प्रांत अधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र प्रांताधिकारी रजेवर असल्याने त्यांनी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या कार्यालयासमोरच उपस्थित त्यांना घेऊन घंटानाद आंदोलन केले यावेळी अन्यायकारक पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. जोपर्यंत ही वाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत आपण संत बसणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी, माजी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, अफरोज राजगुरु,रवी जाधव, उमेश खटावकर महेश पेडणेकर जिगर मेमन शेखर सुभेदार समीरा खलील आधी नागरिकही उपस्थित होते.