डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे लांजा शहरात महास्वच्छता अभियान उत्साहात

Google search engine
Google search engine

लांजा शहर परिसर आणि अंतर्गत रस्ते झाले चकाचक

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम

लांजा | प्रतिनिधी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी एक मार्च रोजी लांजा शहर परिसरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या उपक्रमात प्रतिष्ठानचे सुमारे सव्वा तीनशे श्री सदस्य सहभागी झाले होते. या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ओला आणि सुका असा सुमारे सात टन कचरा हा गोळा करण्यात आला. यामुळे संपूर्ण लांजा शहर परिसर चकाचक झाल्याचे दिसून आले.
ज्येष्ठ निरूपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियान हा उपक्रम वर्षभर राबवत आहे .त्यातूनच १ मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. लांजा रेस्ट हाऊस ते कोर्ले फाटा या अंतरा दरम्यान मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा स्वच्छता करण्यात आली. तसेच काळा पूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओला कचरा साचला होता. त्याचबरोबर शहरातील काही अंतर्गत रस्त्यांवरही ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या महास्वच्छता अभियान मोहिमेमुळे लांजा शहर परिसर व अंतर्गत परिसर हा एकदम चकाचक झाले चित्र या निमित्ताने पहावयास मिळाले.
या महास्वच्छता अभियानात प्रतिष्ठानचे सुमारे सव्वा तीनशे श्री सदस्य सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी सात वाजता या स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. या स्वच्छता अभियानांतर्गत ओला कचरा २ टन ५०० किलो तर सुका कचरा ४ टन ९०० किलो गोळा करण्यात आला .या महास्वच्छता अभियानामुळे संपूर्ण लांजा शहर हे सुंदर स्वच्छ झाल्याचे नागरिकांना पहावयास मिळाले .या स्वच्छता अभियानाचे नागरिकांतून समाधान आणि स्वागत करण्यात येत आहे.