बिळवस मध्ये हागणदारी मुक्त गाव जनजागृती फेरी

Google search engine
Google search engine

 

मसुरे | झुंजार पेडणेकर

बिळवस ग्रामपंचायत आणि बिळवस महिला समूह आणि बिळवस हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने बिळवस येथे हागणदारीमुक्त गाव जनजागृती प्रभात फेरी सरपंच सौ. मानसी पालव यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावेळी बिळवस ग्रामपंचायत सदस्य रंजना रोशन पालव, सीआरपी अमृता आनंद पालव, उर्मिला पालव,सिधी पालव,वेदांती पालव, रश्मी पालव,प्रज्ञा फणसे,सुजश्री पालव,सायली पालव,अंजली सावंत, स्वप्नाली सावंत, संचीता पालव, दिपाली पालव,स्वाती पालव, कल्पना पालव,सविता पालव,सरिता पालव, सानिका पालव,रुपाली पालव,पार्वती पालव, चंद्रकला पाताडे, सायली नाईक, अस्मिता पालव, ममता पालव, विनया पालव, सानिका संतोष पालव,अश्विनी पालव,रजनी पालव,रेवती परब आणि महिला समूहातील सर्व महिला, ग्रामस्थ महिला यावेळी उपस्थित होत्या.ही प्रभात फेरी बिळवस सातेरी जलमंदिर ते बिळवस ग्रामपंचायत यादरम्यान काढण्यात आली. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. या वेळी बोलताना सरपंच मानसी पालव म्हणाल्या,
बिळवस गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी येथील ग्रामपंचायतच्या वतीने विविध उपक्रम हाती घेतले असून ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. प्रशासनाचा हा उपक्रम यशस्वीपणे सिद्धीस नेऊ अशी ग्वाही यावेळी दिली.