शिवसेना पक्ष मजबुतीसाठी काम करणार – आ.रविंद्र फाटक..
कणकवली : शिवसेना पालघर लोकसभा व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख पदी आ. रविंद्र फाटक यांची निवड शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो अभेद्य ठेवण्यासाठी पुढील काळात काम केलं जाईल. सत्तेच्या माध्यमातून कोकणात सर्वांगीण विकास साधला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत अशी संघटना उभारण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना आ.रविंद्र फाटक यांनी दिली आहे.
शिवसेना आ.रवींद्र फाटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून कोकणात दांडगा लोकसंपर्क त्यांचा आहे. अनेक वर्ष शिवसेना पक्षात काम करत असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगले नेटवर्क उभे केकेलं आहे. त्याचा उपयोग करून आगामी काळात शिवसेनेचा बालेकिल्ला राखण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांच्यावर संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडीमुळे दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.