देवरूख : कासारकोळवण येथील शिक्षक प्रकाश तोरस्कर यांचे अपघाती निधन झाले आहे.
प्रकाश तोरस्कर हे बेलारी हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. शाळेत दुचाकीने जात असताना आज गुरुवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास निवेखुर्द येथील निंबेरा पूलावर त्यांचे अपघाती निधन झाले. सतत हसतमुख असणाऱ्या प्रकाश तोरस्कर यांच्या अपघाती निधनाबद्दल कासारकोळवण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होतेय.
अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पोवार यांनी तात्काळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत पाहणी केली आणि पंचनामा केला. या अपघाताचे कारण अद्यप अस्पष्ट आहे.