राजापूर | प्रतिनिधी : राजापूर तालुका व्यापारी संघाच्या वतीने नुकताच राजापूर अर्बन बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हनिफ मुसा काझी व उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर यांचा सत्कार करण्यात आला. राजापूर अर्बन बँक आणि राजापूर तालुका व्यापारी संघाचे गेल्या कित्येक वर्षपासून स्नेहपुर्ण संबंध आहेत. नुकतीच राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली त्यामध्ये अध्यक्षपदी हनिफ काझी आणि उपाध्यक्षपदी प्रसाद मोहरकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल व्यापारी संघाच्या वतीने या दोघांचाही संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बँकेच्या प्रधान कार्यालयात हा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, व्यापारी संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र नवाळे ,खजिनदार व बँकेचे संचालक दीनानाथ कोळवणकर, प्रकाश कातकर, विवेक गादीकर,अभय मेळेकर, प्रशांत पवार, प्रदीप कोळेकर,अनिल कुवेसकर,महादेव गोठणकर बँकेचे संचालक जयंत अभ्यंकर,संजय ओगले, सौ. अनामिका जाधव उपस्थित होते.
याप्रसंगी व्यापारी संघाच्या वतीने नुतन अध्यक्ष व उपाध्यक्षांसह सर्व संचालकांना शुभेच्छा देण्यात आल्या.