सावंतवाडी । प्रतिनिधी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय कडवट शिवसैनिक व सिंधुदुर्गचे माजी जिल्हाप्रमुख अनिल हरी परुळेकर ( रा. सावंतवाडी ) यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
मुंबईत शिवसेनेच्या स्थापनेपासून ते कार्यरत होते. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना रूजविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्व. बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आदी मोठ्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले होते. कडवट निष्ठावंत शिवसैनिक तसेच साहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती.
समाजकारणाचा ध्यास घेत कडवट अन् करारी बाणा शेवटच्या श्वासापर्यंत जपणाऱ्या अनिल हरी परुळेकर यांंनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे ते काका होत. शुक्रवारी सकाळी ८ ते १० या वेळेत त्यांच पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
Sindhudurg