वैभववाडी पं. स. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
वैभववाडी : नरेंद्र कोलते
वैभववाडी पंचायत समितीच्या वतीने आयोजित सत्यनारायण महापूजे निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भेट देत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. पंचायत समितीचे ज्युनियर अभियंता सतीश रावराणे बुवा यांच्या सुस्वर भजनाने सीईओ मंत्रमुग्ध झाले. बुवा सतीश रावराणे यांचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, महिला बालकल्याण जिल्हा अधिकारी श्रीमती काकडे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ श्री नायर यांच्या हस्ते पार पडला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समूहनृत्य, गोंधळ, रेकॉर्ड डान्स, देशभक्तीपर गीते सादर करत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.