रत्नागिरी | प्रतिनिधी : दारुच्या नशेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या वेरवली (ता. लांजा) येथील प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात शुक्रवार 3 मार्च रोजी दुपारी 12.45 वा.सुमारास मृत्यू झाला.
रमेश आत्माराम साळसकर ( 58, रा. वेरवली, ता. लांजा) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. रमेश साळसकर यांना दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत त्यांनी 27 फेब्रुवारीला राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले होते. यात ते भाजून गंभिर जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. ते 90 टक्के भाजल्याने उपचार दरम्यान शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत याबाबत नोंद करण्यात आली आहे.