आई व मुलांच्या नात्यावरचे होणार सादरीकरण
सावंतवाडी । प्रतिनिधी :
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भोसले नॉलेज सिटी सावंतवाडीच्या वतीने शनिवार ११ मार्च रोजी दु पाटी ३ वाजता ‘नाते तुझे नि माझे ‘ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
यामध्ये आई व मुले यांच्यातील जिव्हाळयाच्या नात्याचे सादरीकरण करावयाचे आहे. यासाठी स्पर्धेत भाग घेणाऱ्या आई व मुलगा – मुलगी यांच्या जोडीने ५ मिनिटांच्या कालावधीत वेशभूषा, अभिनय, वक्तृत्व, गाणे किंवा नृत्य यापैकी कोणत्याही माध्यमातून हे सादरीकरण करावयाचे आहे.
यासाठी ५ ते १० वयोगटातील मुले व त्यांची आई यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९९६७७४०४२६ / ७४४८१८७१८९ या संपर्क क्रमांकावर आपली नाव नोंदणी करावी. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
Sindhudurg