कुडाळ प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात शोषखड्डा मोहीमेमध्ये सर्वोकृष्ट निवड झाल्या बद्दल कुडाळ पंचायत समितीला महामहीम राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्यामध्ये 23291 शोषखडयामध्ये एकट्या कुडाळ तालुक्यात 9हजार317 असे सर्वाधिक शोषखड्डे मारण्यात आले आहेत.
सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजनेचा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, प्रधान सचिव नंदकुमार, आयुक्त शंतुनू गोयल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कुडाळ तालुक्यात 9317 शोषखड्डे मारून पूर्ण केले आणि या प्रत्येक शोषखडयामध्ये एका कुटुंबा मागे रु 2557 अनुदान मिळाले. राज्यामध्ये 23291 त्यापैकी 9317 कुडाळ तालुक्याने शोषखड्डे मारले होते. या वैशिष्ट्यपूर्ण स्तुत्य उपक्रमाची राज्य शासनाने दखल घेवुन या कार्याबद्दल कुडाळ पंचायत समितीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर केला होता.
कुडाळ पंचायत समितीला मिळालेला हा पुरस्कार पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी स्विकारला. यावेळी पंचायत समितीचे शेखर माळकर, राजू खेत्री, मंगेश जाधव, विनोद राणे, विलास गोसावी, दिक्षा माळकर, अमित देसाई, रुपेश चव्हाण, दिनेश सर्वेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
स्विकारताना विजय चव्हाण यावेळी संदीपान भुमरे, नंदकुमार, शंतुनू गोयल तसेच शेखर माळकर, राजू खेत्री, मंगेश जाधव, विनोद राणे, विलास गोसावी, दिक्षा माळकर, अमित देसाई, रुपेश चव्हाण, दिनेश सर्वेकर व इतर मान्यवर.