चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पुणे यांचे मार्फत पाच शाळांना मोफत दृकश्राव्य सॉफ्टवेअर प्रदान

Google search engine
Google search engine

गुहागर | प्रतिनिधी : चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पुणे यांचे मार्फत माध्यमिक विद्यालय अडूर, माध्यमिक विद्यालय वाघांबे, जि. प .पूर्ण प्राथ .शाळा अडूर नं. १ जि .प .पूर्ण प्राथ.शाळा अडूर भाटले तसेच जि .प .प्राथ .शाळा नरवण या पाच शाळांना मोफत इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी चे दृकश्राव्यसॉफ्टवेअर देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माध्यमिक विद्यालय अडूर मध्ये करण्यात आले होते .चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी चे प्रमुख श्री संजय देशपांडे ,सौ प्रज्ञा देशपांडे यांनी समर्थ भारत अभियान प्रकल्प पुण्यात राबविला .त्याच प्रकारे कोकणातील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी स्मार्ट अभ्यासिकेची कल्पना त्यांच्यामार्फत अथक परिश्रमातून सुरू केली.

दृकश्राव्य सॉफ्टवेअरचे मोफत वितरण श्री अशोक मराठे साहेब यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी श्री संजय देशपांडे यांनी स्मार्ट अभ्यासिकेविषयी सविस्तर माहिती दिली सॉफ्टवेअरची सर्व वैशिष्ट्ये सांगण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी श्री विष्णु नराम डॉ. कैलास वैद्य, आचार्य विनोबा भावे शिक्षण प्रसारक मंडळ अडूर चे अध्यक्ष श्री पांडुरंग कापले अडूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री खोत साहेब डॉ. वैभव गाडगीळ ,श्री संतोष विचारे, वाघांबे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अभय जोशी, अडूर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आनंदराव चव्हाण ,अडूर नं १ शाळेचे पदवीधर शिक्षक चंद्रकांत पागडे ,अडूर भाटले शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन साळवी , संदिप काजारे , सौरभ रांजाणे , ओंकार मोरे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. के. माने यांनी केले तर आभार प्रदर्शन अभय जोशी यांनी केले कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी अडूर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.