आचरा विद्यूत मंडळ कार्यालयात लाईनमन दिवस साजरा

Google search engine
Google search engine

सुरक्षिततेशी तडजोड न करण्याची घेतली शपथ

आचरा | अर्जुन बापर्डेकर : माझ्या कौटुंबिक जबाबदारीचे व्यवस्थित निर्वाहण करत सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही.ग्राहकांच्या तक्रारीची त्वरित दखल घेत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेईन अशी शपथ घेत आचरा टेंबली येथील विद्यूत मंडळ कार्यालयात लाईनमन दिवस साजरा केला गेला. यावेळी आचरा विद्यूत मंडळ कार्यालयाचे सहाय्यक अभियंता संतोष सरवळे,आचरा येथील व्यापारी अर्जुन बापर्डेकर, मांगिरीष सांबारी, पळसंब उपसरपंच अशी परब, भालचंद्र कोळगे,उदय आचरेकर सेवानिवृत्त विद्यूत कर्मचारी सिद्धार्थ आचरेकर, सदानंद वायंगणकर, विद्यूत मंडळाचे लाईनमन मुरारी जांभळे, बाळू चव्हाण, उमेश कोचरे, विठ्ठल साळकर,मंगेश परब,सतीश आईर,श्रीकांत पोबुर्लेकर,शुभम मुणगेकर, संजय परब, गणेश सावंत, संतोष अपराज,तसेच प्रदीप साटम,शुभदा भाट, यांसह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा देताना अर्जुन बापर्डेकर यांनी जीव धोक्यात घालून विद्यूत वाहिन्यांवर काम करणारया लाईनमनचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.