कर्मचाऱ्यांनी केले महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण
कुडाळ | प्रतिनिधी : वीज महावितरण कंपनीच्या कुडाळ विभागीय कार्यालयाच्यावतीने लाईनमन डे साजरा करण्यात आला वीज पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा म्हणून लाईनमन आपल्या जीवाची परवा न करता ग्राहकांना सेवा देत असतात त्यांची कृतज्ञता मानण्यासाठी हा लाईनमन डे साजरा केला जात असल्याचे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता विनोद विपर यांनी सांगितले.
महावितरण कंपनीच्या कुडाळ विभागीय कार्यालयामार्फत या विभागातील सर्व लाईनमन कर्मचा-यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच लाईनम दिनानिमित्त महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता विनोद विपर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिसाळ, उपव्यवस्थापक आलेखा शारबिद्रे, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, सहाय्यक अभियंता सुरेश राठी, सहाय्यक अभियंता परम, श्री. भेंडेकर उपस्थित होते.