रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न
मसुरे | झुंजार पेडणेकर
माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय, माळगाव यांच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रामस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पाचवी ते सातवी या गटातून सिद्धी नारायण पोयरेकर (वेरली) तर आठवी ते दहा या गटातून निवेदिता संजय जाधव (न्यू इंग्लिश स्कूल माळगाव) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत दोन्ही गटात एकूण ५६ स्पर्धक सहभागी झाले होते. इयत्ता पाचवी ते सातवी मध्ये हर्षिता संतोष पालव (द्वितीय), रिया सुनील भोगले (तृतीय), सानिका अमित ठाकूर व रिद्धी रविंद्र चव्हाण (उत्तेजनार्थ) तर आठवी ते दहावी या गटातून पारस राजन परब (द्वितीय), दत्तप्रसाद विनोद साळकर (तृतीय), निशा निळकंठ हडकर व अभिषेक नारायण चव्हाण (उत्तेजनार्थ) यांनी क्रमांक पटकावले.
विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी अध्यक्ष श्री अरुण भोगले, सचिव गुरुनाथ ताम्हणकर, संचालक अरुण वझे, श्याम चव्हाण, सागर मिसाळ, सिद्धी जाधव, ग्रंथपाल तन्वी राणे, स्नेहा नाईक, मनाली परब पालक, वाचक व विद्यार्थी उपस्थित होते.
याच ठिकाणी १ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. यात ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे –
इयत्ता १ली/ २री –
प्रथम – ओवी राजेश चव्हाण
द्वितीय – तनुष गणेश पालव
तृतीय – सुमेध संदेश कासले
उत्तेजनार्थ – पियुशा राजेशकुमार लब्दे, पूजा रघुनाथ पोयरेकर
इयत्ता – ३री/ ४थी –
प्रथम – डॅलिशा डॅनी लोबो
द्वितीय – पियुष प्रवीण कासले
तृतीय – वैष्णवी नारायण कदम
उत्तेजनार्थ – दूर्वा उदय पालव, सोहम संतोष कासले. सहभागी व विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.