आडवली हायस्कुल येथे रंगभरण व प्रश्नमंजुषा स्पर्धा!

 

पंचक्रोशीतील पाच शाळा सहभागी

मसुरे | झुंजार पेडणेकर

आर.ए.यादव हायस्कूल आडवली येथे अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन कमलाकांत कुबल यांच्या अध्यक्षतेखाली
नुकतेच करण्यात आले. स्वागत मुख्याध्यापक तुषार सकपाळ यांनी केले.संस्था सदस्य श्री अरुण लाड ,शाळा समिती सदस्य श्री प्रमोद मुरारी सावंत व श्री चंद्रदीपक मालंडकर ,सौ. सीमा घाडीगावकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सतिश कदम, उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त पंचक्रोशितील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुभाष विद्यालय आडवली,जि.प. शाळा आडवली नं.१, जि. प. शाळा मालडी नं. १,महात्मा गांधी श्रावण नं.१ ,जि. प. शाळा पळसंब नं. १ या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इयत्ता पहिली ते तिसरी रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती इयत्ता ४थी व ५वी प्रश्नमंजुषा ( लहान गट )व इयत्ता ६वी व ७ वी प्रश्नमंजुषा ( मोठा गट ) अशी स्पर्धा घेण्यात आली होती. वरील सर्व स्पर्धेमध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक चषक, प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देण्यात आली होती. तसेच प्रशालेतील 35 विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या विज्ञान प्रतिकृतींची मांडणी करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून पळसंब नंबर १ चे मुख्याध्यापक श्री. विनोद कदम ,( रंगभरण स्पर्धा ) सौ. तांबे मॅडम व सौ सुर्वे मॅडम ( विज्ञान प्रतिक्रुति )तसेच सौ. कुबल मॅडम यांनी प्रश्नमंजुषा या स्पर्धे साठी परीक्षक म्हणून काम पाहिले होते. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
रंगभरण स्पर्धा
प्रथम क्रमांक -लावण्या सुरेश मेस्त्री ( सुभाष विद्यालय )
द्वितीय क्रमांक – नियती रविंद्र घाडीगावकर ( आडवली नंबर १)
त्रुतिय क्रमांक – तनिजा तुषार श्रावणकर ( श्रावण नंबर १)
प्रश्नमंजूषा लहान गट
प्रथम क्रमांक – आडवली नंबर १
* मनस्वी पल्लव कदम
* विक्रांती प्रविण साटम

द्वितीय क्रमांक – सुभाष विद्यालय आडवली
ओवी सच्चिदानंद भोगटे
सेजल सहदेव राऊत

त्तृतिय क्रमांक
दत्ताराम आनंद लाड
वेदांत योगेश लाड

प्रश्नमंजूषा स्पर्धा

प्रथम क्रमांक -जि प शाळा पळसंब नं.१

सुरज सुभाष पळसंबकर
मंथन रमेश मुंणगेकर

द्वितीय क्रमांक-श्रावण नं.१

ओमकार सुनील लाड
संजीवनी सतीश बाईक

तृतीय क्रमांक- आडवली नं.१

सानिया अनिल राणे
तन्वी जगदीश घाडी
विज्ञान प्रतिकृती
प्रथम क्रमांक
संपदा गोपाळ मेस्त्री
द्वितीय क्रमांक
रोहित रविंद्र वरक
त्रुतिय क्रमांक
हर्षदा राजन मालंडकर.
सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये बक्षीस वितरण सोहळा संपन्न करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहशिक्षिका सौ.पराडकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.वारंग मॅडम यांनी मानले.