कणकवली पोलिसांच्या प्रयत्नांमुळे मनोरूग्णावस्थेत भरकटलेल्या महिलेला मिळाला घरचा आसरा…!

Google search engine
Google search engine

कणकवली : मनोरूग्ण असल्याने भरकटलेल्या अवस्थेत एक महिला गुजरात मध्ये पोहचली. एकवीस दिवस ‘ती’ बेपत्ता होती. परंतु गुजरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे कणकवली पोलिसांच्या सहाय्याने ‘ती’ तिच्या घरी परतली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगवे – आंबेडकरनगर येथील वनिता बाळकृष्ण कांबळे (५७) रा. सांगवे ->आंबेडकरनगर ही महिला काही दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती. घरातून बाहेर पडताना तिने गणपतीपुळे येथे जात असल्याचे सांगितले होते. परंतु त्यानंतर ती घरी परतलीच नाही. घरच्यांनी तिची शोधाशोध केली परंतु ‘ती’ सापडून आली नव्हती.

दरम्यान सदरहू महिला गुजरात पोलिसांना गुजरात – पाठन येथे सापडून आली होती. सतर्क गुजरात पोलसांनी तिच्याकडून माहिती घेतली. कणकवली पोलिसांच्या सहाय्याने त्या माहितीची खातरजमा करून गुजरात पोलिस ‘त्या’ महिलेला घेऊन कणकवलीत पोहचले. कणकवली पोलिसांच्या सहाय्याने त्या महिलेला सांगवे – आंबेडकरनगर येथील तिच्या घरी पोहचवुन तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. गुजरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे भरकटलेल्या ‘त्या’ मनोरूग्ण महिलेला तिच्या घरचा आसरा मिळाला.