आध्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार भवन वर्धापन दिन सोहळा संपन्न
सिंधुनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने पत्रकारांच्या मुलांचा केलेला सत्कार गुणवंत मुलांना प्रेरणा देणार आहे. हे काम कौतुकास्पद आहे. म्हणूनच प्रयत्न केले तर यश मिळेल, प्राविण्य मिळवले तर करिअर घडवता येईल असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी मंगळवारी पत्रकार भवन येथे साजरा झालेल्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार भवनाच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना केले.
सिंधुदुर्ग नगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे बाळशास्त्री जन्मदिवस पत्रकार भवनाचा वर्धापन दिनाच्यानिमित्ताने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी प्रसिद्ध उद्योजक विवेकानंद नाईक ,ज्येष्ठ पत्रकार वसंत केसरकर , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर , पत्रकारांचे नेते माजी अध्यक्ष गजानन नाईक , , दै प्रहार चे संपादक व माजी अध्यक्ष संतोष वायंगणकर, परिषद प्रतिनिधी तथा पुढारी ची आवृत्ती प्रमुख गणेश जेठे ,जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत , ज्येष्ठ पत्रकार माधव कदम मीडिया सेल अध्यक्ष अमोल टेमकर, अभिमन्यू लोंढे , नंदकिशोर महाजन , तालुका पत्रकार व मुख्यालय पत्रकार समितीचे अध्यक्ष आदींसह पत्रकारांचे पाल्य जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्रसंचालन महेश सरनाईक यांनी केले तर प्रास्ताविक सचिव देवयानी वरसकर यांनी केले त्यानंतर जिल्ह्यातील ५० पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले आपल्याला कोणत्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे ते निश्चित करायला हवे त्यावर आपले ध्येय स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत क्रीडा क्षेत्र असो किंवा बी ई इंजिनिअरिंग सह कोणतेही क्षेत्र असो त्यात यशस्वीतेसाठी एम टेक सह वेगवेगळ्या परीक्षा दिल्या पाहिजेत त्यातून आपले करिअर करू शकता प्रथम आपल्याला जो जॉब मिळेल तो घेतला पाहिजे आपल्याला ज्या क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तर ते ध्येय ठेवले पाहिजे त्याप्रमाणे प्रयत्न ठेवून प्रयत्न करा यश निश्चित मिळेल आजच्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी घेतलेली गरुडझेप आपल्या पालकांनी आईने घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे त्यांच्या प्रयत्नामुळे कष्टामुळे आपण ही यशस्वीझेप घेतली आहे आता आपण यशस्वी करिअर करावी जिल्ह्यात अनेक पत्रकारांसह गुणवंत विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक अद्यावत ग्रंथ लायब्ररी , अभ्यासिका आणि कोकणातील नवरत्नांची आर्ट गॅलरी उभी करणे आवश्यक आहे हे सर्व या पत्रकार भवनामध्ये निर्माण केल्यास या पत्रकार भवनाचे वैभव वाढेल पर्यटकांसह लोकांची वर्दळ राहील त्यामुळे अध्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने उभे असलेल्या या वास्तूला अधिकाधिक प्रेरणा चेतना मिळू शकेल या दृष्टीने प्रयत्न करूया स्पर्धा परीक्षा साठी ही मार्गदर्शन देणारे वर्ग घेण्यासाठी प्रयत्न करूया यातून भविष्यात उज्वल विद्यार्थी घडवून प्रेरणा मिळेल असे विचार जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी व्यक्त केले यावेळी मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत नव्या तरुण मतदारांसाठी त्यांनी शपथ ही यावेळी दिली .
प्रसिद्ध उद्योजक विवेक नाईक यांनी आपले विचार व्यक्त करताना आपण एक समाज कार्यकर्ता असताना मला माझ्यासारख्या व्यक्तीला पत्रकार संघाने येथे बोलविले यातूनआत्मीयतादिसून येते आज पत्रकारांच्या पाल्यांचा सत्कार कार्यक्रम आहे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोचलेली विद्यार्थिनी तसेच अनेक पाल्य वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाल्याचे पाहून बरे वाटले यासाठी पालकांचे योगदान महत्त्वाचे असते आज मोबाईलच्या युगात लहान मुलरडल्यावर आई मोबाईल देते मग ते मुल गप्प बसते हा आपल्या मातृत्वाचा पराभव आहे यावर चिंतन मंथन करणे गरजेचे आहे मोबाईल हा राक्षस मुलांना देऊन मागे मिळत आहोत मुलाला पंधरा वर्षाचा कालावधी परिश्रम मेहनतीवर जाण्यासाठीमुलाला सुसंस्कृत सक्षम करणे ही आपल्याबरोबर मुलांची ही जबाबदारी आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी आपले विचार व्यक्त करताना आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि पत्रकार भवन वास्तूचा वर्धापन दिवस आपण साजरा करत आहोत यानिमित्ताने जिल्ह्यातील गुणवंत अशा पत्रकारांच्या पाल्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि प्रसिद्ध उद्योजक विवेक नाईकयांची उपस्थिती लाभली हे महत्त्वाचे आहे त्यांनी पत्रकारांच्या बद्दल काढलेले गौरवोद्गार वाखांडे जोगे असल्याचे ते म्हणाले [ सोबत फोटो यापूर्वी पाठवीले आहेत












