अष्टपैलू कलानिकेतन मालवण संस्थेच्यावतीने भरड दत्तमंदिर येथे आयोजन
मालवण | प्रतिनिधी: मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतन संस्थेच्यावतीने भरड दत्तमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत बालगटात गौरी वस्त, कुमार गटात तेजल गावडे, तर खुल्या गटात आस्था आचरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ दरम्यान अष्टपैलू कलानिकेतनचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर, किरण वाळके, सतीश शेजवलकर, सुधीर कुर्ले, अभय कदम व अन्य उपस्थित होते.
स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. बालगटात ७, कुमार गटात १२ तर खुल्या गटात १२ स्पर्धक असे एकूण जिल्ह्यातील ३१ स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेचा उर्वरित निकाल बालगट द्वितीय- मंजिरी गोवेकर, तृतीय- गार्गी पराडकर, उत्तेजनार्थ- दूर्वा राणे, मनवा केळुसकर, प्रोत्साहनपर- श्लोक सामंत, प्रतिक्षा मणचेकर, कुमार गट- द्वितीय- प्राजक्ता ठाकूर देसाई, तृतीय- कनक काळोजी, उत्तेजनार्थ- मृण्मयी आरोलकर, भूमी नाबर, खुला गट- द्वितीय- निधी जोशी, तृतीय- श्वेता यादव, उत्तेजनार्थ- चैताली मेस्त्री, अंकिता परुळेकर. स्पर्धेत परीक्षक म्हणून संजय धुपकर, केशव पणशीकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन विनोद सातार्डेकर यांनी केले.
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अष्टपैलू कलानिकेतनच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.