चिंदर येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या चिंदर बाजार कामांचा शुभारंभ

Google search engine
Google search engine

दत्ताराम घाडीगांवकर यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन

आचरा | अर्जुन बापर्डेकर : चिंदर गावात जलजीवन मिशन नळपाणी योजना अंतर्गत 69 लाख निधी मंजूर झालेल्या चिंदर बाजार कामाचा शुभारंभ चिंदर गावचे मानकरी दत्ताराम घाडीगांवकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आले. यावेळी सरपंच-सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य- दुर्वा पडवळ, महेंद्र मांजरेकर-निलेश रेवडेकर, ग्राम विस्तार अधिकारी मंगेश साळसकर, शिवाजी खोत, दिपक कानविंदे, मनोहर घाडी, रमेश घाडी, विश्राम माळगांवकर, रणजित दत्तदास, सिध्देश नाटेकर, पाताडे आदी उपस्थित होते.