लोकशाही दिन 08 मार्च 2023 रोजी

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.
जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडील अधिसूचना क्रमांक / ससाशा/कार्या-अ.का.3/स्थानिक सुटटया /2023,दि. 28 फेब्रुवारी 2023 अन्वये सन 2023 साठी स्थानिक सुटया जाहीर करण्यात आल्या आहेत. दि.06 मार्च 2023 रोजी होळी निमित्त स्थानिक सुट्टी व 07 मार्च 2023 रोजी धुलीवंदनाची शासकीय सुट्टी असल्याने माहे मार्च 2023 मधील लोकशाही दिन बुधवार, 08 मार्च 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे.
लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात. तसेच अर्जदारानी 15 दिवस अगोदर दोन प्रतीत अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे, असे शुभांगी साठे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.