देखभाल व दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा योजना महिला बचत गटाकडे देणार!

रत्नागिरी जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

रत्नागिरी | प्रतिनिधी : 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हातील नऊ तालुक्यामध्ये पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्तीसाठी नळ पाणी पुरवठा योजना महिला बचत गटाकडे देण्याबाबतचे नियोजन जिल्हा परिषद रत्नागिरीने केलेले असून, जिल्हाच्या इतिहासातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम असेल असे प्रतिपादन मा.श्री.किर्ती किरण पुजार (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केले.
जिल्हामध्ये जल जीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सर्व कुटुंबाना सन 2024 पर्यंत प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतीदिन, गुणवत्तापुर्वक पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने जिल्हामध्ये हर घर नल सें जल हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त देशामध्ये स्वच्छ सुजल शक्ती सन्मान साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा परिषदने स्वच्छ सुजल शक्ती सन्मान अंतर्गत लांजा तालुक्यातील ग्रामपंचायत इंदवटी अंतर्गत महसूल गांव निवोशी हे दिनांक 6.3.23 रोजी जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल सें जल म्हणून सरपंच श्री .विनोद सखाराम गुरव यांनी विशेष ग्रामसभेमध्ये घोषित करुन, क्रांती उत्पादक महिला बचत गटाकडे पाणी पुरवठा योजनाची देखभाल व दुरुस्ती करणेसाठी प्रायोगीक तत्वावर देण्यात आलेला आहे. विशेषत: सदरच्या महिला बचत गटाने स्वयंप्रेरणेने जबाबदारी स्वीकारलेली आहे. महाराष्ट्र जीवनउन्नोती (उमेद) याच्याकडे नोंदणीकृत असलेल्या या बचत गटामध्ये एकूण 17 महिला कार्यरत आहेत. बचत गटाने योजनेची 100% पाणीपट्टी वसूल करणे, स्ञोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करणे, नियमित TCL ची माहिती देणे, रासायनिक व जैविक तपासणी करणे, किरकोळ दुरूस्ती ही कुशल – अकुशल मनुष्यबळाकडून करवून घेणे यासारखी कामे करण्याबाबतचा ठराव करण्यात आला.सदरचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .पुजार सर, श्रीम .घाणेकर मॅडम ( प्रकल्प संचालक DRDA), श्री .राहूल देसाई सर प्रकल्प संचालक ( पा.व स्व.) व श्रीम. मयुरी पाटील मॅडम कार्यकारी अभियंता (ग्रापापु) यांचे विशेष प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत आहे