आंबोलीत गोवा बनावटीच्या दारूसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Google search engine
Google search engine

एक ताब्यात : आंबोली पोलिसांची कारवाई

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट

सावंतवाडी । प्रतिनिधी : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या अवैध दारूची महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून
गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ लाख ८ हजारांच्या दारुसह ४ लाखाची गाडी मिळून तब्बल ५ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (३६, रा. अदालट्टी, ता. अथणी, बेळगांव ) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक शिंदे, हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई व होमगार्ड जंगले यांनी आंबोली तपासणी नाक्यावर केली. यात गोवा बनावटीच्या इम्पेरियल ब्ल्यू ब्रँडच्या बाटल्यांचे नऊ बॉक्स जप्त करण्यात आले. तर या प्रकरणी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची शेवरलेट एन्जॉय ( के ए – २३ एन ३६३५) ही कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.