कणकवली : एस्. एम्. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कणकवली केंद्र क्रमांक – ०८६१ वरील इयत्ता बारावी परीक्षार्थींच्या बैठक व्यवस्थेत दि. ८ मार्च, २०२३ रोजीच्या जीवशास्त्र – BIOLOGY पेपरकरिता बदल करण्यात आलेला आहे.
एस्. एम्. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कणकवलीमध्ये सध्या बारावीची आणि दहावीची बोर्ड परीक्षा सुरू आहे. दिनांक ८ मार्च २०२३ रोजी सकाळ सत्रात ११: ०० तें २:१०या वेळेत जीवशास्त्र विषयाचा पेपर होणार आहे. याच दिवशी उल्लेखित वेळी दहावीचासुद्धा पेपर केंद्रावर होणार आहे. त्यामुळे बारावी परीक्षार्थीची बैठक व्यवस्था केंद्रावर अपुरी पडत असल्याने कणकवली कॉलेज कणकवली येथील इमारतीमध्ये ही बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
पुढीलप्रमाणे काही परीक्षार्थींची फक्त उल्लेखीत एकाच दिवसासाठी व एकाच पेपरसाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दि. ०८मार्च २०२३
वेळ – ११:०० ते ०२:१०
विषय – जीवशास्त्र (BIOLOGY).
परीक्षा ठिकाण – कणकवली कॉलेज, कणकवली.
परीक्षा बैठक क्रमांक – W007639 ते W007792 एकूण पाच परीक्षा ब्लॉक्स.
तरी कृपया परीक्षार्थीना याची नोंद घ्यावी, असे प्रशालेचे उपप्राचार्य तथा केंद्र संचालक पी. व्ही. कांबळे यांनी संगितले आहे.