कुवारबाव येथे भाजपाच्या वतीने पाककला स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब , माजी आमदार बाळासाहेब माने आणि कुसुमताई अभ्यंकर पतसंस्था आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आज कुवारबाव भाजपा कार्यालयात पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी 20 महिलांनी स्पर्धक म्हणून भाग घेतला होता . सहभाग घेतलेल्या महिलांमध्ये कुवारबाव व जवळपासच्या भागातील महिला सहभागी झाल्या होत्या .सदर स्पर्धेच्या परीक्षणासाठी आम्ही सारे खवय्ये फेम सौ अदिती राजेंद्र भावे या परीक्षक म्हणून लाभल्या होत्या.
कार्यक्रमाला उपस्थित स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब चे पदाधिकारी व सदस्य यांनी सदर महिलांचे व परीक्षकांचे आज शिमगे असून सुद्धा हजर राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल विशेष आभार मानले