शिवजयंतीनिमित्त गवाणे येथे कंस बलराम कृष्ण युद्ध स्पर्धेचे आयोजन

Google search engine
Google search engine

लांजा | प्रतिनिधी : शिवजयंती उत्सवानिमित्त (तिथीप्रमाणे) गवाणे येथे शुक्रवार दिनांक १० मार्च रोजी रात्री आठ वाजता तालुकास्तरीय भव्य दिव्य कंस बलराम आणि कृष्ण युद्ध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा तालुका आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा गवाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त या भव्य दिव्य तालुकास्तरीय कंस बलराम आणि कृष्ण युद्ध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गवाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण बारा संघ सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख रुपये ५५५५ व चषक असे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे .द्वितीय विजेत्यांना ३३३३ व चषक, तृतीय विजेत्यांना २२२२ व चषक तर उत्तेजनार्थ क्रमांकाला रुपये ११११ व चषक असे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वैयक्तिक स्वरूपाची कंस, बलराम, कृष्ण अशी वैयक्तिक स्वरूपाची बक्षीसे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेचा तालुक्यातील रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गवाणे शिवसेना शाखा आणि लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा यांच्या वतीने करण्यात आले आहे.