आदर्शगावं केर येथे महिला दिन संपन्न
दोडामार्ग | प्रतिनिधी : यशस्वी होण्यासाठी संयम महत्वाचा असतो आणि तीच ताकद महिलांमध्ये असते. कुटुंबाचा विचार केल्यास महिला कुटुंबाचा कणा आहेत असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक अनंत देसाई यांनी केले.
आदर्शगाव केर ग्रुप ग्रामपंचायत केर – भेकुर्ली येथे महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सरपंच रुक्मिणी नाईक, सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, सेवानिवृत्त शिक्षक अनंत देसाई, माजी सरपंच मीनल देसाई, जेष्ठ ग्रामस्थ भोरजी नाईक, श्री. सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष श्री. देसाई यांनी महिलांची गावंविकासातील भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावात विविध व्यवसायाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला सौ. सुचिता प्रेमानंद देसाई, सौ. माधुरी महादेव देसाई, सौ. सुहानी सखाराम देसाई, सौ. शुभदा शिवराम देसाई, सौ. प्रिया प्रभाकर देसाई यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक संदीप पाटील, प्रास्ताविक तेजस देसाई यांनी केले.