कलमठ येथील खुशबू महिला बचत गटाला मिळाला राज्यस्तरावरील प्रथम क्रमांक

Google search engine
Google search engine

ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला महिला दिनी सत्करा

राज्यात १०० बचत गटात ठरला खुशबू बचत गट सरस

गट निर्माण करत असलेल्या उत्पादनावर चित्रपट व लघुपट तयार करण्याची होती स्पर्धा

नवी मुंबई येथे महालक्ष्मी सरस कार्यक्रमात झाले बक्षिसाचे वितरण

संतोष राऊळ | कणकवली : “खुशबू मसाले” या नावाने अल्पावधीतच महाराष्ट्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कणकवली तालुक्यातील कलमठ येथील खुशबू महिला बचत गटाला राज्यस्तरावरील चित्रपट आणि लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. राज्यभरातील वेगवेगळ्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या बचत गटांनी चित्रपट आणि लघुपट तयार करून त्याचे प्रात्यक्षिक सादर करणे ही राज्यातील प्रतिष्ठेची स्पर्धा सरकारने घेतलेली होती. यात अंतिम स्पर्धेसाठी शंभर महिला बचत गट सरकारने निवडलेले होते. त्यामधून खुशबू महिला बचत गटाने प्रथम पारितोषिक मिळवून राज्यात आपला ठसा उमटवला आहे. ३ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन खुशबू महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ तनवीर शिरगावकर यांचा महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज महिलादिनी सत्कार करण्यात आला.

नवी मुंबई येथे महालक्ष्मी सरस या राज्यभरातील महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन,विक्री आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते खुशबू महिला बचत गटाचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला बचत गटाचे सदस्य रोहिणी निमनकर, हुमेरा नाईक,रेहाना पटेल, आदी महिला सदस्य उपस्थित होत्या.खुशबू महिला बचत गट कलमठ यांनी खुशबू मसाले ही स्वतःची निर्मिती बाजारात आणली आहे.यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवले जातात. राज्य सरकारने अशा बचत गटाच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे,या हेतूने बचत गट निर्माण करत असलेले सर्वप्रकारची उत्पादने त्याची चित्रफित तयार करून प्रदर्शित करण्याची स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेसाठी राज्यभरातून महिला बचत गट निवडण्यात आले. त्यात शंभर गट सरकारच्या माध्यमातून निवडले गेले.यामधून खुशबू महिला बचत गट कलमठ याची निवड केली होती. त्यात शभर मधून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

आपणच निर्माण करत असलेल्या उत्पादनांचे चित्रपट आणि लघुपट करून देण्याची ही स्पर्धा राज्य सरकारने घेतली. त्यात प्रथम पारितोषिक कणकवली तालुक्यातील कलमठ येथील खुशबू महिला बचत गटाने मिळविणे हे प्रतिष्ठेचे मानले जात आहे.त्यामुळे अध्यक्ष सौ तनवीर शिरगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.