राष्ट्रवादी महिला काँग्रेसपार्टीच्यावतीने ‘सन्मान नारीशक्ती’चा कार्यक्रम
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी : महिला दिन हा एक दिवस साजरा केला जात असला तरीही ३६५ दिवस हे महिलांचेच असतात. आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीय. उलट मिळालेल्या संधीच सोन करण्याची ताकद महिलांमध्ये आहे. त्यामूळे जिजाऊ सावित्रीच्या या लेकी इतिहास घडवतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केला.
जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्यावतीने ‘सन्मान नारीशक्ती’चा या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. उद्योजिका, गृहिणी, घरकाम करणाऱ्या महिला, मदतनीस, झाडू बनविणाऱ्या महिला, शिक्षिका, डॉक्टर, गायिकांसह विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यात सरिता सावंत, प्रांजली सुभेदार, प्रज्ञा मोंडकर, क्रांती मिशाळ, सुरेखा रंकाळे, नुरजहान खतीब, विणा दळवी, उषा पुनाळेकर, नुसरत राजगुरू, अनिता रसाळ, वृषाली भोसले, हसीना कडबी, मयुरी बावकर, स्नेहल गोडसे, ममता वाडकर, दिपा आसोलकर, सरिता मामलेकर, वंदना तोडणकर, संजीवनी शिरसाट, सुंदरी पेडणेकर, अनुराधा महाजन, समिक्षा पटेल, सविता देसाई, रिहाना खान, सरोज धारगळकर, क्रांती मेस्त्री, फरजाना तहसीलदार, ममता केसरकर, प्रांजल राऊळ आदींचा सत्कार करण्यात आला.
महिला दिनाच औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात महिलांनी कर्तूत्व सिद्ध केले आहे. त्यांचा आज सन्मान करताना आनंदाने उर भरून आला आहे. आजच्या कार्यक्रमाच प्रेरणास्रोत माझी आई आहे. सर्वसामान्य कुटुंबात आमच बालपण गेलं. अथक परिश्रम करून आईनं वडीलांना साथ देत संसार उभा केला. समाजात कार्यरत असणारी प्रत्येक स्त्री याच पद्धतीने कष्ट करत आपला संसार चालवते. मुलाबाळांना आधार देते. अशा स्त्रीयांचा सन्मान करावा या दृष्टिकोनातून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे अर्चना घारे यांनी यावेळी सांगितले.
आमचे नेते शरद पवार यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळवून दिल. या आरक्षणामुळे आज महिला लोकप्रतिनिधी आहेत. महिला आयोगाची निर्मिती देखील त्यावेळी केली. त्यांच्यामुळे महिलांना समाजात संधी मिळत आहे. त्या संधीच महिला सोन करत आहेत. जिथे महिलांना गरज राहिल तिथे आम्ही सोबत राहू असा विश्वास अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महिलांसाठी विविध गेम्सच आयोजन देखील करण्यात आल होत. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, महिला निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, सावली पाटकर, पुजा दळवी, अँड. सिद्धी परब, गौरी गावडे, हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, राकेश नेवगी, बावतीस फर्नांडिस आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Sindhudurg