रत्नागिरी: भारतातील अग्रगण्य पॅसेंजर कार मनुफॅकचरर टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स चे देशातील सर्वात मोठे डीलर नेटवर्क आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृत वितरक एस.पी.ऑटोहब यांचे तर्फे खास महिला दीन निम्मित रत्नागिरी पोलीस, जिल्हा परिषद, आरोग्य केंद्र ई. ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या महिलांना पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
टाटा मोटर्स नेहमीच महिलांचा मान आणि सन्मान करण्यात अग्रेसर राहिला आहे याचाच एक भाग म्हणून टाटा मोटर्सच्या सर्व मनुफॅक्चरींग प्लॅन्ट मध्ये मोठ्या प्रमाणात अगदी असेम्ब्ली लाईन वर देखील महिलांना काम करण्याची संधी दिली आहे.
महिलांकरिता चालवणेस सोईस्कर अशा ऑटोमॅटिक कार्स टाटा सफारी , हॅरियर , नेक्सोन , अल्त्रोज, टियागो , टिगोर या सर्व प्रकारात उपलब्ध करून दिल्या आहेत.
लवकरच स्व मालकीच्या भव्य शोरुम मध्ये स्थलांतरित होत असून ग्राहकांनी सध्या एम आय डी सी मधील तात्पुरत्या स्वरूपातील सेल्स आउटलेट ला ग्राहकांनी भेट द्यावी असे आवाहन अरूण देशपांडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे