गांधी चौकातील धुळवड शहराचे भेटीला

Google search engine
Google search engine

मंडणगड | प्रतिनिधी : शिमगोत्सवाचे कालवाधीत मंडणगड गांधी चौक येथील धुळवड या कलापथकाने शहरात आपली कला सादर केले. अनेक दशकांची पंरपरा लाभलेला हा प्रकार तालुक्याचा आकर्षणाचा विषय आहे. प्रतिक रुपाने सजवलेले राधा कृष्ण संकासुरा व कृष्णाच्या लिलांवरील पांरपारीक गीतांचे सादरीकरण धुळवडीत केले जाते या कार्यक्रमात गांधी चौक येथील श्री. संतोष चव्हाण, मनोज अधिकारी, प्रमोद पोरे, दत्तप्रसाद गांगण, नरेश शेरे, मंदार गोसावी यांच्यासह ग्रामस्थ व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.