प.पू. शोभाताई माऊली यांची उपस्थिती
कणकवली । प्रतिनिधी : श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी महाराज सत्संग सोहळा शनिवार दि. २ मार्च रोजी सिद्धगिरी मठ कणेरी कोल्हापूरचे २६ वे मठाधिपती श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या पट्टशिष्या प. पु. शोभाताई माऊली यांच्या उपस्थितीत होत आहे. श्री स्वामी महाराजांच्या दिव्य दर्शनाने स्वामी महाराजांच्या नामाच्या जयघोषात व साक्षात भगवंताच्या स्वरुपाच दर्शन घडविणाऱ्या अमृतमय प्रवचनाने हा सोहळा संपन्न होणार आहे.
गणेश मंदिर, नाटळ हायस्कूल जवळ, कणकवली येथे हा सोहळा संपन्न होणार असून सायं. ४.३० वा. संध्याकाळचे भजन,सायं. ६.०० वा. व्यासपिठावर महाराजांची नपुजा,सायं. ६.३० वा. सुस्वर भक्तीगीते, ७ वा. दासबोध
समासाचे बाचन, रात्री ७.१० वा. प. पु. शोभाताई माऊलींचे अमृतमय प्रवचन, रात्री ९ वा. आरती, शेजारती, पाळणा व महाप्रसाद होणार आहे.
नाटळ, गणेश मंदिर, नाटळ हायस्कूल जवळ, राजवाडी फाटा, ता. कणकवली येथे होणाऱ्या या सोहळ्याला सर्व गुरुभक्त व भाविकांनी उपस्थित राहून गुरुभक्तीचा लाभ घ्यावा अस आवाहन करण्यात आले आहे.