सायकल प्रवासातून ‘आरोग्य’ संदेश

Google search engine
Google search engine

 

मसुरे नं. 1 शाळा पदवीधर पदवीधर शिक्षक विनोद सातार्डेकर यांचा आदर्शवत उपक्रम

मालवण | प्रतिनिधी : सायकल प्रवास आरोग्यासाठी नेहमीच चांगला. हा संदेश शाळेतील विद्यार्थ्यांना, तरुणांना देत मसुरे नं. शाळा पदवीधर पदवीधर शिक्षक विनोद सखाराम सातार्डेकर यांनी वराडकरवाडी वायरी भूतनाथ ते मसुरे नं. 1 शाळा हा सुमारे 25 किलोमीटर प्रवास सायकलने करत आगळावेगळा संदेश दिला आहे.

सध्याच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या काळात सायकल चालवण्याचा व्यायाम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही आरोग्यदायी आहे. योग आणि व्यायामाप्रमाणे सायकल चालवल्यानं हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते. सकाळी सायकल चालवल्यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते आणि रात्री झोपही चांगली येते. असे शिक्षक विनोद सातार्डेकर यांनी सांगितले.

या उपक्रमाला मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, गुरुनाथ ताम्हणकर, गोपाळ गावडे रामेश्वरी मगर, उमेश खराबी, हेमलता दुखंडे, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, स्थानिक शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सन्मेश मसुरेकर, उपाध्यक्ष शितल मसुरकर आदीनी शुभेच्छा दिल्या.