पाटपन्हाळे विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

Google search engine
Google search engine

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रम मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांच्या अध्यक्षतेत नुकताच संपन्न झाला . सदरच्या जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयातील महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती विशेष ठरली. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात जागतिक महिला दिनकार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस. चव्हाण , सौ.एस.एस.मोरे , सौ. एन.पी.वैद्य , सौ.एस.एस. नांदलस्कर , सौ.ए.आर.चव्हाण , श्रीम.आर.आर जाधव , सौ.पी.पी.पवार या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाध्यक्ष श्री.एम.ए. थरकार यांचे सांस्कृतिक विभाग प्रमुख व मराठी शिक्षिका सौ.एस. एस.चव्हाण यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

उपस्थित मान्यवर महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या . सदरच्या जागतिक महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन सौ.एन.पी.वैद्य यांनी केले . सौ.ए.आर.चव्हाण यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व , महिलांचा होणारा सन्मान , महिलांचे गौरवणीय कार्य आदी मुद्द्यांनुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाध्यक्ष श्री.एम.ए. थरकार यांनी जागतिक महिला दिन कार्यक्रमाचा हेतू , महिलांचे उल्लेखनीय कार्य , सर्वच क्षेत्रांमध्ये गुणवंत ठरणाऱ्या महिला आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन करून महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते . शिक्षिका सौ.एस.एस.नांदलस्कर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष , उपस्थित मान्यवर महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी यांच्या सहकार्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.