हिवाळे येथे महिलांना शिलाई मशीन वितरण

 

जनशिक्षण संस्था वतीने उपक्रम ; जिप माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचा पाठपुरावा

मालवण | प्रतिनिधी : महिला दिनाचे औचीत्य साधून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जनशिक्षण संस्था अध्यक्षा उमा प्रभू यांच्या कडून हिवाळे ग्रामपंचायत मध्ये १० महिलांना शिलाई मशिन वितरण करण्यात आले. माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी पाठपुरावा केला. जनशिक्षण संस्था समन्वयक विलास हडकर यांची प्रमुख उपस्थीती कार्यक्रमास लाभली.

यावेळी हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, उपसरपंच लक्ष्मण परब, ग्रामसेवक मळगांवकर, तलाठी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या विद्या पवार, सानिका सावंत, बुथ कमिटी अध्यक्ष विश्वनाथ परब, स्त्री ग्रामशक्ती संघ अध्यक्ष भोगले, सचिव चंदना चव्हाण crp आम्रपाली पवार, कोषाध्यक्ष प्राजक्ता कदम, लिपीक रिया गावडे व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या तसेच यावेळी १० महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात आले.

तसेच ग्रामपंचायत तर्फे महिलांच्या सहभागातून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. बक्षिस वितरण कार्यक्रम घेण्यात आले या कायक्रमा वेळी सुत्रसंचालन चंदना चव्हाण यांनी केले व आभार आम्रपाली पवार यांनी मानले.