उपाध्यक्ष पदी ॲड. किरण पराडकर तर सचिव पदी ॲड. प्रकाश बोवलेकर
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ला तालुका बार असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष पदी ॲड. सुषमा प्रभूखानोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष ॲड. जी.जी. टाककर यांनी त्यांचे असोसिएशनच्या वतीने अभिनंदन केले.
वेंगुर्ले तालुका बार असोसिएशन च्या कार्यकारणीमध्ये तालुका
उपाध्यक्ष पदी ॲड. किरण पराडकर, सचिव पदी ॲड. प्रकाश बोवलेकर यांची निवड करण्यात आली आहे. सहसचिव पदी ॲड. मनीष सातार्डेकर, खजिनदार ॲड. सागर ठाकूर तर सदस्य म्हणून ॲड, समीर मुनणकर, ॲड. अक्षदा राऊळ यांची एकमताने निवड करण्यात आली.
दरम्यान सेक्रेटरी ॲड. बोवलेकर यांनी सभेचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी जेष्ठ विधिज्ञ ॲड. शाम गोडकर, ॲड. सूर्यकांत प्रभूखानोलकर, ॲड. जि. जि. टांककर, ॲड. दिनकर वडर, ॲड. श्रीकृष्ण ओगले तसेच ॲड. संदीप परब, ॲड. धनंजय झांट्ये, ॲड. तेजश्री कांबळी, ॲड. शुभांगी सडवेलकर, ॲड. पुनम नाईक, ॲड. श्वेता पिळणकर – चमणकर, ॲड. सुधा केळजी, ॲड. आरती गावडे, ॲड. भावना पोखरे, ॲड. तेजश्री झांट्ये, ॲड. हर्षदा कुडव व ॲड. एकता धानजी आदी उपस्थित होते. मावळते अध्यक्ष ॲड. जि .जि. टांककर आणि सर्व विधिज्ञांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. ॲड. गोडकर, ॲड. सूर्यकांत प्रभूखानोलकर, ॲड. पराडकर यांनी नूतन कार्यकारिणीला मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. ॲड. जि.जि. टांककर यांनी सभा खेळीमेळीने व एकदिलाने पार पाडल्या बद्दल सर्वांचे आभार मानले.