स्त्री हॉस्पिटलने जपली महिला दिनी सामाजिक बांधिलकी
संतोष कुळे | चिपळूण : स्त्री ही वासल्याची मूर्ती आहे. जशी महिलाही प्रेम, माया, आपुलकीची प्रतिमा आहे. तशीच ती धैर्यशील आणि रणरागिणी सुद्धा आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी यशाचे पाऊल टाकत प्रगतीचे उंच शिखर गाठत आहेत. समाजातील अशा काही महिला आहेत ज्याने आपल्या कर्तुत्वाने यश प्राप्त केले आहे. अशा महिलांच्या कार्याचा आणि त्यागाचा सन्मान म्हणजेच खरा महिला दिन आहे असे मत डॉ. अभिजीत सावंत यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिपळूण शहरातील श्री हॉस्पिटल येथे समाजामध्ये काम करणाऱ्या काही महिलांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्री हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये पुढे बोलताना डॉ. श्री. सावंत म्हणाले की, समाजात अनेक महिला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी अशा महिला आपल्या बुद्धी कौशल्य व परिश्रमातून कामकाज करत आहेत .मात्र त्यांनी केलेल्या कामाची दखल घेणे सुद्धा तेवढेच क्रमप्राप्त आहे. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने श्री हॉस्पिटलच्या वतीने काही महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम सुरू करीत असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. त्यांनी महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरता महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी डॉ. रश्मी सावंत यांनी सांगितले की, महिला दिन फक्त महिलांनी साजरा न करता या दिनाची व्याप्ती वाढली पाहिजे. एका स्त्री शिवाय एक कुटुंब अपूर्ण असते .एक आदर्श महिला स्वतःचे कुटुंब व समाज घडवण्याचे काम करत असते. त्यामुळे अशा महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप महिला दिनी दिली तर निश्चितच त्यांचे मनोबल वाढेल. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये आरती निराधार फाउंडेशन विषयी नेत्रा पाटील यांनी माहिती दिली आरती फाउंडेशनच्या अनिता आत्माराम नारकर आणि कापसाळ येथील स्वाती सुरेश साळवी या दोन महिलांचा रोख रक्कम व मानपत्र शाल श्रीफळ देऊन डॉ. पाटणकर व डॉ.जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी स्वाती साळवी व अनिता नारकर यांनी आपल्या सामाजिक कार्याची थोडक्यात माहिती दिली. या कार्यक्रमाला बालरोग तज्ञ डॉ. अमरसिंग पाटणकर ,स्त्री रोग तज्ञ डॉ.वैभव जाधव, डॉ. अभिजीत सावंत, डॉ. रश्मी सावंत यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सर्वांचे आभार सुद्धा डॉ. अभिजीत सावंत यांनी मानले.