विशाल परब यांनी भेट घेत दिले सोहळ्याचे निमंत्रण
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून कुडाळ येथे यानिमित्ताने शिवगर्जना हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी भेट घेऊन या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळ प्रमोद सावंत यांनी या नाट्यप्रयोगास आणि निलेश राणे यांच्या भव्य वाढदिवस समारंभास उपस्थित राहण्याचे आश्वासन यावेळी विशाल परब यांना दिले.
विशाल सेवा फाउंडेशनच्यावतीने १७ मार्च रोजी निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथील एसटी स्टँड नजीक मुंबई-गोवा हायवेच्या बाजूला भव्य ‘शिवगर्जना ‘ या महानाट्याचा प्रयोग होणार आहे. कोकणात हा भव्य नाट्य प्रयोग प्रथमच होत आहे. या नाट्यप्रयोगात ७०० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. तर हत्ती घोडे उंट असा लवाजमा यात असणार आहे. या नाट्यप्रयोगात छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक प्रसंग दाखवले जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण कोकणवासियांना या प्रयोगाचे आकर्षण निर्माण झाले आहे.
यावेळी भाजपाचे नेते निलेश राणे यांचा वाढदिवसही भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्र गोव्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे युवा नेते व विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि प्रमोद सावंत यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. प्रमोद सावंत यांनी स्वतः आपण या नाट्यप्रयोगास आणि भव्य अशा वाढदिवस सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आश्वासन यावेळी विशाल परब यांना दिले.
Sindhudurg