शिवसेना महिला शहर आघाडीतर्फे महिला दिन साजरा

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे  जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम जगन्नाथराव भोसले उद्यान येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सोळंके यांचा जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.शहरातील ज्या महिला मेहनत व चिकाटीने स्वतःच्या पायावर उभ्या राहुन लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरू करून इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. अशा सत्कार मुर्तीना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महिलांसाठी फनी गेम्स, डान्स, फुगडया असे विविध कार्यक्रम घेऊन बक्षिसे देण्यात आली.

या कार्यक्रमाला  जिल्हा संघटक सौ.निता सावंत ,शहर संघटक सौ.भारती मोरे माजी. नगरसेविका अनारोजीन लोबो, सौ.शुभांगी सुकी, सौ.दिपाली सावंत, किर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर,सपना नाटेकर,पदाधिकारी गीता सुकी, शिवानी पाटकर, शैलजा पारकर, कमला मेनन,भारती परब, पुजा नाईक, साधना मोरे, निलीमा चलवाडी ,सिमा सोनटक्के, सुवर्णा गाड, धनश्री सावंत, सायली होडावडेकर, अनुजा होडावडेकर, सत्त्वशीला कुपवडेकर, निता प्रसादी ,लतिका सिंग, सुप्रिया गावडे,जयश्री बिरजे, कमल मांडवकर,  सुजाता गावडे, राजश्री निर्गुण, कांचन जाधव, पुजा कोरगांवकर,  लक्ष्मी मेस्त्री, मनाली राऊत,प्रतिक्षा मिशाळ,संध्या पाटणकर , जयश्री ठाकुर, जयश्री राणे ,मनीषा परब, विद्या कोरगांवकर, पुनम जामसंडेकर, क्रांति मिशाळ ,श्रेया नाईक आदी उपस्थित होत्या.