बॅ नाथ पै सेवांगण येथे गायनाचा कार्यक्रम
मसुरे | झुंजार पेडणेकर
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे वामनराव काराणे स्मृति संगीत विद्यालय कट्टा या क्लासच्या विद्यार्थिनीनी गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम सादर केला.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला
पल्लवी सावंत हिने
ब्रम्हा विष्णू हे भक्तीगीत,
स्वरा पेंडूरकर हिने अवचिता परिमल,
सुजाता पावसकर हिने सेवा धर्मी पुण्य आहे,
अनुष्का लाड हिने ऋतू हिरवा,
वैष्णवी लाड यानी ऐरणीच्या देवा,
अपेक्षा पेंडूरकर यानी झिनी झिनी,
पूर्वा मोरजकर हिने नाविका रे,
गीता नाईक यानी माझ्या मनी प्रिया इत्यादी गाणी सादर केली.
कार्यक्रमाच्या शेवटी रवीना पांजरी हिने तुकाराम बीजाचे औचित्य साधून
‘पद्मनाभा नारायणा’ हे गीत आणि मधुर पेंडूरकरने ‘दत्त दर्शनाला जायाचे’
हे गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. गीतगायनाचे सूत्रसंचालन वैष्णवी लाड यानी केले
आरती कांबळी यांनी आभार मानले.
हार्मोनियम साथ महेश तळगावकर,
तबला अर्जून पेंडूरकर व भगवान काळसेकर
तसेच अरविंद वराडकर यानी सहकार्य केले.
या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, हरेश चव्हाण, मधुरा माडये,
सौ झाटये, प्रियांका भोगटे, आरती कांबळी व महिला उपस्थित होत्या.