शहराच्या मध्यभागी असलेल्या जागेत लवकरच सुसज्ज स्टॉल

Google search engine
Google search engine

वैभववाडी शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्टॉल च्या जागेची नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडून पाहणी 

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्टॉलच्या जागेचे मोजमाप करत नगराध्यक्ष नेहा माईंणकर व मुख्याधिकारी सुरजकुमार कांबळे यांनी पाहणी केली. आमदार नितेश राणे यांनी दिलेला स्टॉलधारकांना शब्द लवकरच पूर्ण केला जाईल. शहराच्या मध्यभागी असलेल्या जागेत लवकरच सुसज्ज स्टॉल उभारण्यात येतील असे नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शासकीय जागेत उभारण्यात आलेले अनधिकृत स्टॉल हटविण्यापूर्वी नगरपंचायत वाभवे – वैभववाडी या ठिकाणी बैठक पार पडली होती. यावेळी आमदार नितेश राणे यांनी स्टॉल धारकांना एक मे पर्यंत आपल्यासाठी सुसज्ज स्टॉल उभारण्यात येईल असा शब्द दिला होता. या पार्श्वभूमीवर शासकीय गोडाऊन नजीक असलेल्या जागेचे मोजमाप करत  मुख्याधिकारी सुरज कुमार कांबळे यांनी पाहणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, राजन तांबे व नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.