मंडणगड | प्रतिनिधी : सरकारी निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व अंशकालीन, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यवतीने सध्याची एन.पी. एस. यी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी व अन्य प्रलंबीत मागण्यासाठी 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप आयोजीत करण्यात आला आहे समन्वय समितीने येथील तहसिल कार्यालयात या संदर्भात नुकतीच सभा घेतली असून संप शंभर टक्के यशस्वी करण्याचे समितीचे नियोजन आहे. या संपात तालुक्यातील सर्व स्तरातील समस्याग्रस्त कर्मचारी सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे. सर्व प्रकारचे कर्मचाऱी करीत असलेला संघर्ष ऐतिहासीक ठरणार आहे. जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भातील घोषणा केल्याशिवाय मागे न हटण्याचा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबीत मागण्याबांबत शासनाने ठोस भुमीका घ्यावी अशी कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आहे. यात पी.एफ. आर.डी.ए. कायदा रद्द करा, कंत्राटी, अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमीत करा, सर्व रिक्त पदे तत्काळ भरा, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या बिनाशर्त करा, चतुर्थश्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, शिक्षक शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यात सत्वर मंजुर करा, कामगार कायद्यातील जाचक अटी रद्द करा, आठव्या वेतन आयोग स्थापनेची कार्यवाही सुरु करा, या सहा दहा मागण्यांचा समावेश आहे. समन्वय समिती रत्नागिरी अध्यक्ष सुरेंद्र भोजे, सचिव चंद्राकांत चौघुले, कार्याध्यक्ष दिनेश सिनकर, सचिव सागर पाटील रविंद्र मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व स्तरातील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत