भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने मालवणात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
अमित खोत |मालवण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण भाजप महिला मोर्चा पदाधिकारी यांच्या वतीने मालवण शहरातील महिला पोलीस, आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी, सेतू कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपमहिला तालुकाध्यक्षा पूजा करलकर, शहर अध्यक्ष अन्वेषा आचरेकर, ओबीसी सेल महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, महिमा मयेकर, दिव्या कोचरेकर, स्नेहल पराडकर, तारका चव्हाण उपस्थित होत्या.













