Devgad : दुचाकीची धडक बसून एकाचा मृत्यू

जामसंडे पेट्रोल पंपा नजिक दुचाकीची पादचाऱ्याला धडक बसून झालेल्या अपघातात जामसंडे वेळवाडी येथील ६५ वर्षीय अनंत श्रीधर तेली याना गंभीर दुखापत होऊन त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला .

ही घटना ८ मार्च रोजी सायं.८.१५ च्या सुमारास जामसंडे पेट्रोल पंप नजीक घडली. यातील दुचाकी स्वार दर्शन प्रदीप भोवर रा. जामसंडे विष्णुनगर हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन जात असताना हा अपघात घडला या घटनेची नोंद देवगड पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे