भांबेड ते गावडी रस्त्याची उल्का विश्वासराव यांच्याकडून शनिवारी प्रत्यक्ष पाहणी

Google search engine
Google search engine

भांबेड येथे भाजपा कार्यालयात करण्यात आला उल्का विश्वासराव यांचा सत्कार

लांजा | प्रतिनिधी : तालुक्याच्या पूर्व भागातील रस्ते फुल यासाठी दहा कोटींचा भरघोस निधी दिल्याबद्दल भाजपा नेत्या उल्का विश्वासराव यांचा शनिवारी ११ मार्च रोजी भांबेड येथील भाजपा संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांनी भांबेड ते गावडी या रस्त्याची संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या उल्का विश्वासराव यांनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या कामांना राज्य शासनाने प्राधान्यक्रम देत अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भरघोस निधीची उपलब्धता करून दिली. लांजा तालुक्याचा भूभाग मोठ्या प्रमाणात डोंगराळ असल्याने या भागात दळणवळणाच्या अत्यंत मर्यादित सुविधा उपलब्ध आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अशाप्रकारे अडीअडचणी नागरिकांना भेडसावत असणे दुर्दैवी गोष्ट आहे. यासाठी शासनाकडे विकासकामांची यादी घेऊन नियोजनबद्ध रीतीने उल्का विश्वासराव यांनी पाठपुरावा केला. यामध्ये शिपोशी हरिहरेश्वर मंदिर येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रभानवल्ली खोरनिनको महालक्ष्मी येथे पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर झाले आहेत. याशिवाय भांबेड कोलेवाडी मौजे मांजरे गावडी घाटाच्या सर्वेक्षणासाठी १ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

शनिवारी उल्का विश्वासराव यांनी भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थांसह भांबेड ते गावडी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर भाजपा कार्यालयात त्यांचा याबद्दल सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भांबेड जि प गट प्रभारी महेश इंदुलकर, बुथ अध्यक्ष अतुल गुरव यांच्यासह महेश गांगण, सुनील गुरव, अमोल रेडीज, संदेश गुरव, शंकर गांधी, सचिन शिवगण, प्रमोद गुरव आदींसह अन्य भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.