चिमुकल्या कबीरचे पर्यावरण रक्षणाचे अनोखे उदाहरण

चॉकलेट चिप्स सारख्या वस्तूंचे कागद बाटलीत जमा करून न. प. ला सादर

शांतिनिकेतनच्या विद्यार्थ्याने कृतीतून दिला आदर्श

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सावंतवाडी येथील शांती निकेतन इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता पहिलीत शिकणारा निसर्ग व प्राणिमित्र म्हणून प्रसिद्ध असलेला कु. कबीर जफर नवीद जफर हेरेकर या चिमुकल्याने समाजासमोर निसर्ग व पर्यावरण रक्षणाचे एक अनोखे उदाहरण सादर केले आहे. या मुलाने आपल्या घरामध्ये, मित्रांकडे व शेजार्यांकडे वापरामध्ये येणारे चाॅक्लेट, चिप्स,तेलाची पिशवी, दुधाच्या पिशव्या व इतर प्रकारचे प्लास्टिक गेली सहा महिने गोळा करुन ते सर्व रिकामी पाण्याच्या बाॅटल मध्ये भरले आहे.

त्याच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

याबाबत तो म्हणतो, आपण जेव्हा हे प्लास्टिक बाहेर फेकतो तेव्हा हे प्लास्टिक गाई, म्हशी, माकड व इतर प्राणि खातात व ते प्लास्टिक त्यांना न पचता त्यांच्या मृत्युचे कारण ठरते. मातीत मिळाल्याने पर्यावरण देखील दुषीत होते यासाठीच आपण हे करत असल्याचे स्पष्ट केले.

कबीरने भरलेल्या सगळ्या बॉटल्स सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावड़ेकर यांच्या स्वाधिन केल्या. कबीरच्या या कार्याचे मुख्याधिकारी जावड़ेकर यांनी अगदी मनापासून कौतुक केले‌ आणि भविष्यात देखील असे कार्य करत राहा व आपल्या मित्रांना देखील प्रोत्साहित कर असे सांगितले. तुझे हे कार्य स्वच्छ भारत अभियानचा एक महत्वपूर्ण हिस्सा आहे, अशा शब्दांत त्यांनी कु. कबीरचे कौतुक केले.

फोटो – चॉकलेट चिप्स व अन्य पदार्थांचे प्लास्टिक बाटलीत भरून न.प. मुख्याधिकार्‍यांना सादर करताना शांती निकेतनचा विद्यार्थी कबीर ( जतिन भिसे )

Sindhudurg